Aamhi ShabdaBhramar

Monday, May 29, 2006

आला पाऊस

पाऊस काल सांगून गेला येऊन माझ्या स्वप्नात,
तयार हो स्वागताला येतोय मोठ्या थाटात
तू मात्र यंदा काही लिहायाचे नाही
कागदावरच्या शब्दांनाही मुळीच भिजायाचे नाही

पडेल मी तू सांगेन तेव्हा तिला भेटताना
विजही तुला भेटून जाईन, जरा मने जुळताना
तू मात्र यंदा तेथेच थांबायाचे नाही
वार्यावरल्या मृद्गंधाला नुसतेच वाहायचे नाही

मला आवडतो पाऊस असे सांगेन ती तुला
होईन दूर मी तेव्हा इंद्रधनु दावण्या तुम्हाला
तू मात्र यंदा एकटे राहायाचे नाही
तुझ्या पाखराला नक्की सांगायाचे काही

सरेन नंतर नेह्मीसारखाच काम पूर्ण करून
भेटत राहीन तुम्हाला तुमचेच प्रेम बनून
तू मात्र मला विसरायाचे नाही
शब्दामधून स्वप्ने मात्र फुलवायची यंदाही
-
केतन

0 Comments:

Post a Comment

<< Home