चोचले (गझल)
पुरवले मी काळजाचे चोचले
तेवढ्यापुरतेच ते संकोचले!
वैर त्यांचे लाघवी आहे खरे
दुःखही माझे तयांना बोचले
बाब आहे काळजीची केवढी!
भक्त गाभाऱ्यात कैसे पोचले?
हाय! काटे कोवळे होते किती!
पाकळ्यांना बोट माझे टोचले
काय सांगू ऐट 'साहेबास' मी?
आंधळ्यांनी फक्त सदरे खोचले
-नीलहंस

0 Comments:
Post a Comment
<< Home