Aamhi ShabdaBhramar

Saturday, March 25, 2006

तूही नाही... - गझल

तूही नाही..

अव्यक्त माझे भाव अन् बोलणार तूही नाही !
दडवलय मी हे गुपित अन् खोलणार तूही नाही !

रमणीय सृष्टी,रंगली मैफल स्वर्गीय सुरांची !
निश्चल मी तरी अन् डोलणार तूही नाही !

लपवूनि अर्थ गहिरे; उधळले शब्द सारे !
न मोजले मी कधी अन् तोलणार तूही नाही !

भरलेला समोर हा प्याला; साखर सर्व तळाला !
प्यालो मी तसाच् अन् घोळणार तूही नाही !

हा अबोल दूरावा भासे जणु वैषाखाचा वणवा !
थंड आहे मी तरी अन् पोळणार तूही नाही !

क्षणोक्षणी तुझेच् स्मरण; आलो कधी चुकून समोर..
नजर मी चुकवेन; अन् ओळखणार तूही नाही !

-परीक्षित

0 Comments:

Post a Comment

<< Home